निर्मलवारी – स्वयंसेवा अनुभव Latest post

निर्मलवारी – स्वयंसेवा अनुभव

September 29, 2025

 🙏 रामकृष्ण हरी! 🙏मैत्रिणीचा what's app वर message आला आणि लगोलग फोन. 'निर्मल वारी मध्ये स्वयंसेवक म्हणून मी सहभागी होणारे. तुला यायचंय?' वारी माहिती आहे. निर्मल वारी काय? अर्थात विठू माउलीच्या ओढीने जे असेल त्यात जायचं हे मनाशी जवळजवळ निश्चित झालं. आळंदी देहू ते पंढरपूर अशी पायी यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीला सातशे वर्षांची परंपरा आहे. परंतु गेली कित्येक वर्षे प्रचंड वाढत्या गर्दीमुळे स्वच्छतेची समस्या अधिकाधिक गंभीर होऊ लागली. प्रत्येक गावी पालखीसोबत चालणाऱ्या लाखो लोकांच्या शौच विधी मुळे पालखी पुढे निघून गेली तरी त्या गावांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर रूप धारण करु लागला. गावांच्या यंत्रणेला हा भार पेलणे अशक्य होत असे. स्वच्छ भारत कसा होणार, कधी होणार आणि यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा सहयोग या संस्थेमार्फत सरकारी यंत्रणेच्या मदतीने 2015 साली पोर्टेबल टॉयलेट्सची कल्पना प्रत्यक्षात आली. दरवर्षी या प्रकल्पात गावांची, पोर्टेबल टॉयलेट्सची तसेच स्वयंसेवकांची संख्या वाढती राहिली आहे. गेल्या चार-पाच वर्षात चार कोटी लिटर विष्ठेची विल्हेवाट लावली गेली आहे खरंच कमाल सेवायोग!! 🙏 तर अशा या मलरहित अर्थात निर्मल वारी मध्ये स्वयंसेवक म्हणून माझे काम काय असणार होते तर वारीसाठी आलेले अनेक वारकरी हे ग्रामीण भागातून असतात. शौचविधी साठी शेतात जाणे हे तर रोजचेच असते त्यांच्यासाठी. अशावेळी त्यांच्यात टॉयलेट्स वापरण्यासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे असते. टॉयलेट्सची प्रत्यक्ष स्वच्छता करणे, मैला उचलणे इत्यादी कामांसाठी एक वेगळी एजन्सी कार्यरत असते.  शनिवारी २५ तारखेला आम्हाला निर्मल वारी साठी स्वयंसेवक म्हणून सासवडला जाऊन काम करायचे होते. न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एकत्र जमून वरिष्ठ अनुभवींकडून उपयुक्त सूचना घेऊन ३ बसेस भरून आम्ही सारे मार्गस्थ झालो. वाटेत एका ठिकाणी थांबून, अंगतपंगत करून, छान चांदणी भोजन झालं. फार छान वातावरण निर्माण झालं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मोठा युवावर्ग देखील आमच्या बरोबर होता. अर्थातच भोजनानंतर पद्यगायन झाले. आणखीही काही सूचना घेऊन निघालो आणि सासवडला पोहोचलो. गजबजलेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी माऊलींचे दर्शन घडत होते. सर्व वारकरी हे एकमेकांस माऊली म्हणूनच संबोधतात. या प्रचंड गर्दीत न हरवता एकमेकांसोबत राहणे, आपल्या वस्तू सांभाळणे हे सारे तर येतेच. ही खबरदारी घेतघेत सासवड नगरपरिषदेच्या पटांगणात जमलो. आता १ ग्रुप लीडर आणि त्याचे ८/९ सहकारी मिळून ९/१० जणांचा एक ग्रुप असे १२ ते १३ ग्रुप्स तयार करण्यात आले. प्रत्येक ग्रुपला एकेक स्पॉट ठरवून दिला गेला. नियोजन अगदी आखीव होते. त्या त्या स्पॉट ला कसे पोहचायचे याची लिंक आमच्या what's app group वर लगेचच share करण्यात आली. प्रत्येक स्पॉट वरील सुपरवायझर, वायरमन तसेच पाणी टँकर यांची नावे त्यांच्या फोन नंबर सहीत तयार असलेली PDF FILE सुद्धा मिळाली. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्तम शिस्तबद्ध काम बघायला मिळाले. उद्या सकाळी परतीसाठी किती वाजता आणि कुठे एकत्र भेटायचे ते सांगितले गेले. बसेस कुठे उभ्या असतील त्याचीही लिंक आम्हाला मिळाली. रजिस्ट्रेशन करतेवेळी बरोबर कायकाय आणावे हे सांगितले होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे काय असेल तर lot of energy and a bag to pack the memories. हे सारं सोबत घेऊनच सारे ग्रुप्स field वर पोहोचले.  आमच्या स्पॉटवरती २०० पोर्टेबल टॉयलेट्स कालपासूनच सिद्ध होती. सासवड मध्ये एकूण १००० टॉयलेट्स आणली गेली होती. एक स्वतंत्र मोठी टीम स्वच्छतेसाठी तैनात होती. वीज पाणी यांचा पुरवठा अखंड व्यवस्थित चालू होता. टँकर भरभरून पाणी येत होतं. ड्रम्स भरत होते. माऊलींच्यासाठी छोट्या बादल्या देखील तैनात होत्या. ठराविक कालावधीनंतर मोठ्या पाईपने सर्व मैला सक करून काढून, घेऊन जाण्यासाठी s3..

READ MORE

निर्मल वारी- अनुभवाची शिदोरी!
निर्मल वारी- अनुभवाची शिदोरी!

September 29, 2025

सेवा सहयोगसोबतचा माझा प्रवास: माझा अनुभव

February 09, 2025

Chinmaya Smiles Back— The Joy of Giving
Chinmaya Smiles Back— The Joy of Giving

December 24, 2024

Celebrating Volunteering
Celebrating Volunteering

December 19, 2024

My Journey from Employee Engagement to Impactful Volunteerism

Giving Back to Society: A Journey of Purpose and Impact

Gram Vikas- Brahmanshevge village has undergone a remarkable transformation

April 13, 2023

Seva Sahayog Foundation’s prompt response ignites change in the lives of tribal students